मराठी अनुवाद: अन्तरा करवड़े

कर्करोगाच्या शेवटच्या टप्प्यावर असलेल्या षष्ठिपूर्ति झालेल्या रुग्णाला बघून तिच्या ह्र्दयात काहूर माजला होता। मनाचे म्हणणे होते कि कर क्षमा, पण तत्क्षण शरीरावर किळसवाण्या अळ्या फिरु लागायच्या आणि त्यांना वेचून वेचून फेकतांना तिला मळमळायला लागायचं। तरीही अळ्या कमी होत नसे, न मळमळ! डोळ्यासमोरुन ते दृश्य कधी दूर होत नसे जेव्हां तिला टाहो फोडायचा होता, खूप जोरात। पण एक बळकट हात तिला हे करु देत नव्हता। कधी चॉकलेटची घूस तर कधी नांव खराब होण्याची भीति दाखवत तो नेहेमीच त्या दहा वर्षाच्या लहानगीच्या तोंडावर असायचा।
आई म्हणायची – घाबरतेस कशाला? तुझ ’काका’ आहेत कि ते।
आज तीस वर्षाच्या वयात सुद्धा जर नवरा चुकून स्पर्श करतो, तरी ती घाबरते, ज्याने लहानपण आणि तारुण्य दोन्ही हिसकावून घेतेले आहे। आज पण तिला सगळे ’काकाच’ वाटतात, मनावर आवर घालता येत नाही। तरीही ती ’क्षमा’ करु इच्छित आहे।
या अवस्थेत जेव्हां डॉक्टरांनी घरी नेण्याबद्दल सांगितले, तर दोन्ही परदेशी मुलांनी नोकर आणि परिचारिकेच्या भरवशावर सोडून फ्लाईट धरली।
ती जेव्हां त्यांच्या खोलीत एकटी असायची, त्यांचे दोन्ही हात जोडलेले असायचे आणि डोळ्यात अश्रुप्रवाह दिसायचा।
क्षमा करु इच्छित होती ती, तरी…
एवढ़े आहे, कि तिला इतके कळून चुकले होते, कि तिने क्षमा केले असो किंवा नाही, देवाने त्यांना क्षमा केलेले नाहीये।
-0-