अक्तुबर 2026

भाषान्तरपोटासाठी/ पेट का सवाल     Posted: October 1, 2026

अनुवादः वसुधा सहस्रबुद्धे 

खडीमध्ये डांबर मिसळणाऱ्या मुलाच्या थोबाडीत मारून ठेकेदार ओरडला ,” काय रे ,बापाचा माल  वाटला का ?”

मुसमुसत  मुलाने सांगितलं , “साहेब  कमी डांबर घालून खडी बरोबर बसत नव्हती ना !रस्ता चांगला व्हायला हवा म्हणून माप बरोबर केलं होतं.”

“अरे बाळा , माझ्या कामावर तू नवीन आला आहेस .एवढं डांबर घातलंस तर माझी ठेकेदारी तू बंद करशील! ” 

मग त्या मुलाला समजावून सांगितलं , “बाळा ,या डांबरामध्ये कारकून ,इंजिनियर ,अधिकारी ,मंत्री सगळ्यांचे हिस्से असतात .वाईट रस्त्यावर मला सुद्धा धक्के बसतात . चल ,यामध्ये आणखी खडी चुरा घाल बघू .” मनातल्या मनात ठेकेदार खर्चाचा हिशोब करीत हॊता .

निराश मनाने मुलगा ठेकेदाराच्या सूचनेप्रमाणे काम करू लागला . त्याचा उतरलेला चेहरा बघून ठेकेदार म्हणाला ,” बाळा यामध्ये सगळ्यांचं  पोट आहे .चांगला रस्ता बनवला आणि सहा महिन्यात खड्डे पडले नाहीत तर इंजिनियर साहेब पुढचं कॉन्ट्रॅक्ट दुसऱ्या ठेकेदाराला देतील . या खड्ड्यांमुळे सगळ्यांचं पोट भरतं , बाळा ! ” 

-0-

गतिविधियाँ

  • सम्पर्क:-

    सुकेश साहनी

    185,उत्सव,महानगर पार्ट–2
    बरेली–243122 (उ.प्र.)


    sahnisukesh@gmail.com

    रामेश्वर काम्बोज ´हिमांशु´

    रचनाएँ भेजने के लिए ई-मेल-:-

    laghukatha89@gmail.com

    विशेष सूचना-:-

    पूर्व अनुमति के बिना लघुकथा डॉट कॉंम की सामग्री का उपयोग नहीं किया जा सकता ।

    केवल स्वीकृत रचनाओं की ही सूचना दी जाती है।

    -सम्पादक द्वय

Design by TemplateWorld and brought to you by SmashingMagazine