जून 2026

भाषान्तरगुलाबचा कप     Posted: May 1, 2023

मराठी अनुवाद: अन्तरा करवड़े

सकाळच्या वेळेस वृद्ध हीरालाल स्वैंपाकघरात शिरले, तर गुलाबी कप आपल्या जागेवर नव्हता। त्यांनी प्रत्येक ठिकाणी बघितले। पण कप कुठेच नव्हता। नवीन कप तर ठेवले होते, पण त्यांचा आवडता गुलाबी कप नव्हता। आधी तर कप्प्यातच असायचा। त्यांच्या मित्रानी दिला होता, लग्नाच्या पंच्वीसाव्या वाढ़दिवसानिमित्त। म्हणाला होता – गुलाबी कपांमध्ये चहा प्यालला कि प्रेम वाढ़त जातं। तेव्हांपासून ते त्या गुलाबी कपांमध्येच चहा पीत आले होते। सहामधून दोन कप मुलाच्या लग्नात फुटले, दोन मुलीच्या लग्नात। त्या कपांमध्ये चहा पिणारे सुद्धा आता ते दोघेच उरले होते। पाच वर्षांपुर्वी त्यांची जीवनसंगिनी गुलाब त्यांना सोडून जाण्याच्या आधी सुनेकडून एक कप फुटला होता। तेव्हां कितीतरी वेळा, ते आणि गुलाब एकानंतर एक, असे घोट-घोट चहा त्या कपामधून पीत बसायचे। शेवटचा तो कप तुटू नये, म्हणून ते स्वत:च धुवून ठेवायचे। आणिक कोणत्याही कपात त्यांना चहाची चवच येत नसे।

तेवढ्यात सून उठून आली। त्यांनी कपाबद्दल तिला विचारले।

“किती जुना झाला होता तो पप्पा! बाकी कपांसोबत तो एकटा विचित्र दिसत होता। काल रात्री स्वच्छता करतांना तुमच्या मुलाने फेकून दिला आहे। नवीन कप आणले आहेत ना, त्यातून घ्या। चहाच तर प्यायचा आहे।”

“चांगला तर होता किती, सुरेख दिसायचा।” ते मनातल्या मनात बड़बड़त खोलीत आले आणि बिछान्यावर पडून राहिले।

“यांना काय कळणार जुन्या वस्तूंचे महत्व। मी आणि गुलाब त्याच कपात चहा पीत होतो। कपाच्या दांडीवर तिच्या बोटांचे ठसे होते, कड्यांवर तिच्या ओठांचे।।।। इतके लक्ष देऊन धुवत होतो मी, कि कोणत्याही ठशावर साबण न लागला पाहिजे।।।। यांना काय कळणार या स्मृतिंचा मोल।।।”

त्या दिवसानंतर ते कधीच स्वैंपाकघरात नाही गेले। सून कितीही आलं-वेलची घालून चहा करायची, पण त्यांना काहीच चव येत नव्हती। अर्धा प्यायचे, अर्धा सोडून देत असे।

                                        -0-

गतिविधियाँ

  • सम्पर्क:-

    सुकेश साहनी

    185,उत्सव,महानगर पार्ट–2
    बरेली–243122 (उ.प्र.)


    sahnisukesh@gmail.com

    रामेश्वर काम्बोज ´हिमांशु´

    रचनाएँ भेजने के लिए ई-मेल-:-

    laghukatha89@gmail.com

    विशेष सूचना-:-

    पूर्व अनुमति के बिना लघुकथा डॉट कॉंम की सामग्री का उपयोग नहीं किया जा सकता ।

    केवल स्वीकृत रचनाओं की ही सूचना दी जाती है।

    -सम्पादक द्वय

Design by TemplateWorld and brought to you by SmashingMagazine