अक्तुबर 2026

भाषान्तरनवजन्मा/ नवजात     Posted: December 1, 2025

मराठी अनुवादः डॉ.वसुधा सहस्रबुद्धे

जिल्ले  सिंह शहरातून घरी आला. अंगणात पाय ठेवताच त्याला विचित्र शांतता जाणवली. आजीबाईने नाकावरचा सरकलेला चष्मा वरती सरकवीत  निराश आवाजात म्हटलं , जिल्ले ! डोक्यावरचा

कर्जाचा भार  उतरवायला आत्तापासूनच कामाला सुरुवात कर, मुलगी झाली रे बाबा !

जिल्लेच्या कपाळावर एक आठी पडली. 

दादा ,मुलगा झाला असता तर भरपूर आहेर मिळाला असता . माझा पण आहेर बुडाला . धाकटी बहीण फुलमती कुरकुरत म्हणाली ,’ पहिलीच वेळ होती असं वाटलं होतं भरपूर काय काय मिळेल.’ जिल्लेचा चेहरा ताठरला . कपाळावर अजून एक आठी पडली . 

आई काही बोलली नाही पण तिचं गप्प राहणं खूप बोलकं होतं . जणू सांगत होती योग्य मुलगा शोधताना नाकी नऊ येतील आणि कुठल्या कुचकामी माणसाच्या पायावर पगडी ठेवावी लागेल कोणास ठाऊक !

चिडलेला जिल्ले मनदीपच्या खोलीत घुसला. बाहेरचे आवाज तिने आधीच ऐकले होते. नवजात मुलीचे डोळे बंद होते. पतीला  समोर बघून तिने डोळे पुसले आणि अपराधी भावनेने तोंड दुसऱ्या बाजूला वळविलं .     

जिल्ले बाणासारखा बाहेर पडला आणि चौपालवाल्या गल्लीत वळला. 

सकाळपासून शहरात गेलेला जिल्ले आत्ताच परत येत होता . तुम्हाला दोघीना असं बोलायची काय गरज होती ?’ आई कुरकुरत म्हणाली. घरातली शांतता अधिकच गडद झाली. 

थोड्या वेळात जिल्ले परत आला. त्याच्या पाठोपाठ संतू ढोलकेवाला गळ्यात ढोल अडकवून  अंगणात मध्यभागी  येऊन उभा राहिला. जिल्लेचा मजबूत आवाज घुमला. ‘ वाजव .’

तिडक – तिड- तिड- तिड धुम्म,तिडक धुम्म!  

ढोल वाजला . 

मोह्ल्लेवाले चकित झाले. जिल्लेने कपाटातून पगडी काढली, जी पगडी तो लग्नकार्यात किंवा समारंभात बांधीत असे. ढोलाच्या बोलांवर जोरदार आवेशात नाचत नाचत त्याने अंगणात तीन चार गोल  फेऱ्या मारल्या. खिशातून शंभरची नोट काढली. आणि मनदीपच्या खोलीत जाऊन नवजात मुलीवरून ओवाळली तिच्या अर्धवट मिटलेल्या डोळ्यांना हळूच लावली. पतीच्या चेहऱ्याकडे पाहताना मनदीपच्या डोळ्यासमोर जणू उजेडच उजेड झाला. यावेळी डोळ्यातून ओसंडणारे अश्रू तिने पुसले नाही. 

बाहेर येऊन जिल्लेने ती नोट संतू ढोलवाल्याला दिली. 

संतू अधिकच जोरात ढोल वाजवू लागला –  तिड – तिड – तिड तिडक धुम्म, तिडक धुम्म ! तिडक धुम्म !तिडक धुम्म !

गतिविधियाँ

  • सम्पर्क:-

    सुकेश साहनी

    185,उत्सव,महानगर पार्ट–2
    बरेली–243122 (उ.प्र.)


    sahnisukesh@gmail.com

    रामेश्वर काम्बोज ´हिमांशु´

    रचनाएँ भेजने के लिए ई-मेल-:-

    laghukatha89@gmail.com

    विशेष सूचना-:-

    पूर्व अनुमति के बिना लघुकथा डॉट कॉंम की सामग्री का उपयोग नहीं किया जा सकता ।

    केवल स्वीकृत रचनाओं की ही सूचना दी जाती है।

    -सम्पादक द्वय

Design by TemplateWorld and brought to you by SmashingMagazine